Thursday, January 23, 2025
spot_img

Latest Posts

शंकर महादेवन, महेश काळे आणि राहुल देशपांडे या संगीतातील तीन उस्तादांच “वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

संगीत नाटके हा मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ मानला जातो आणि हीच परंपरा जपत, संगीत मानापमान या अजरामर नाटकावरून प्रेरीत लवकरच प्रदर्शित होणाऱ्या “संगीत मानापमान” या सिनेमाच्या माध्यमातून मराठी प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव पडद्यावर पहायला मिळणार आहे. नुकताच या सिनेमाचा एक अप्रतिम टिझर रोहित शेट्टीच्या “सिंघम अगेन” या सिनेमासोबत रिलीज झाला होता ज्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. ‘संगीत मानापमान’ ह्या चित्रपटावरूनच यात संगीताची मजेशीर मेजवानी असल्याचं लक्षात येत. आणि याचीच सुरवात आज चित्रपटाच्या पहिल्या “वंदन हो गाण्याने झाली.

कट्यार काळजात घुसली नंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांना संगीत विश्वातील दिग्गज संगीतकार शंकर महादेवन, गायक महेश काळे आणि राहुल देशपांडे यांचा आवाजातील तिहेरी संगम अनुभवायला मिळणार आहे. या आधीही ही सुप्रसिद्ध तिकडी एकत्र येऊन गायली होती परंतु चित्रपटातील गाण्यासाठी एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ आहे.  हल्लीच चित्रपटातील पहिल्या गाण्यासाठी शंकर महादेवन, महेश काळे आणि राहुल देशपांडे यांनी मुंबईतील एका स्टुडिओत वंदन हो हे गाणं शूट केलंय. उत्तम संगीत आणि गीतकार हयामुळे सेट वर किती प्रसन्न वातावरण होतं हे  नुकताच सेट वरून वायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये तूम्ही पहिलंच असेल. आज “वंदन हो”  गाण्याने सुरवात करुन चित्रपट निर्मात्यांनी नक्कीच कलेला केलेले एक सांगीतिक वंदन आहे. मंत्रमुग्ध करणारं साउंडट्रॅक “वंदन हो” वैविध्यपूर्ण संगीत शैलींचा कळस आणि परंपरेचा मिश्रण असलेलं हे गाणं चाहत्यांच्या नक्कीच पसंतीस उतरेल याची खात्री आहे.

संगीतकार शंकर महादेवन हे “वंदन हो” या गाण्याबद्दल आपलं मत व्यक्त करत म्हणाले की, “माझं सौभाग्य आहे कि मला हे गाणं राहुल देशपांडे आणि महेश काळे यांच्या सोबत करायला मिळालं, नक्कीच आमच्यासाठी हे एक फेरिटेल आहे, संपूर्ण टीम जरी तीच असली तरी आमचं म्युझिक मात्र खूप वेगळं आहे. सुबोध भावे दिग्दर्शित या चित्रपटात अजून भरपूर अप्रतिम गायक आहेत, समीर सावंत यांनी लिरिक्स सिनेमाच्या गाण्याला दिले आहेत त्यामुळे प्रेक्षकांना ही संगीतमय भेट नक्कीच आवडेल.”

राहुल देशपांडे म्हणाले की ” मला अतिशय आनंद झाला, कट्यारचे दिवस आठवले, शंकरजी खूप मोठे जिनिअस आहेत त्यांनी खूप छान कंपोझिशन केलय त्यामुळे मी स्वतःला खूप लकी समझतो.

इतकच नव्हे तर महेश काळे ह्यांनी सुद्धा भावना व्यक्त करत सांगितलं की “मानापमानचा हिरो म्हणजे या चित्रपटाची गाणी आहेत. मला खात्री आहे कि आमच्या कट्यारच्या ह्या संघाकडून नवीन येणारा संगीत मानापमान चित्रपट तुम्हाला नक्की आवडेल.”

या चित्रपटात एकूण १४ गाणी आहेत, तर ह्या गाण्यांना १८ दिग्गज गायकांनी गायले आहे. इतकच नव्हे तर या चित्रपटाला सुरेख संगीत देणारे त्यातले ७ गायक हे नॅशनल अवॉर्ड विनर गायक आहेत. त्यामुळे या चित्रपटाद्वारे सर्वश्रेष्ठ गायकांनी सजवलेली मैफिल आपल्याला पाहायला मिळणार आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका सुबोध भावे करणार असून, सुमित राघवन, वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ सारखे आणखी दिग्गज कलाकारांना आपण सिनेमात पाहू शकतो. अजरामर संगीत कलाकृती संगीत मानापमानचं म्युझिक कंपनी सारेगामा आहे. ‘जिओ स्टुडिओज प्रस्तुत, निर्माती ज्योती देशपांडे निर्मित, श्री गणेश मार्केटिंग निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित आणि अभिनित, “संगीत मानापमान!” १० जानेवारी पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!

Latest Posts

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.