गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ह्यांनी गोव्यात केले जिओ स्टुडिओज आणि सुबोध भावे दिग्दर्शित मराठी चित्रपट “संगीत मानापमान” च्या स्क्रिनिंग चे भव्य आयोजन. गोव्यातील चित्रपट प्रेमींसाठी हा जणू एक आनंदाचा उत्सव होता. या स्क्रिनिंग साठी चित्रपटातील मुख्य कलाकार सुबोध भावे, वैदेही परशुरामी, सुमित राघवन, शैलेश दातार, सुनील फडतरे आणि सुबोध भावे ह्यांची पत्नी मंजिरी भावे उपस्थित होते. आपल्या सोशल मिडिया अकाउंट वरून पोस्ट करत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, “चित्रपट बघून खूप छान वाटलं, सिनेमाच्या संपूर्ण टीमला माझ्याकडुन खूप खूप शुभेच्छा.” सर्वत्र “संगीत मानापमान” सिनेमाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळतोय, संगीत प्रेमींसोबत लहान मुलं सुद्धा आनंद लुटताय. अप्रतिम चित्रीकरण आणि एक से बढकर एक गाणी असा हा संगीतमय चित्रपट “संगीत मानापमान” १० जानेवारी पासून मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झालाय आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य ही करतोय.